महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू न केल्याने राज्यातील खासगी अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील शासनमान्य महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपन/प्रसुती रजा मंजूर होण्याचा प्रश्न अजूनही मार्गी लागला नाही.यासंबंधी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्याजीत तांबे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली.
राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी तसेच खासगी कंपन्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती/ बालसंगोपन रजा देण्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी कडक आदेश संबंधित अस्थापनांकडे जावेत
यासाठी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्यजीत तांबे यांनी भेट घेतली
मागील फडणवीस सरकारने
राज्यातील खासगी अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय न घेतल्याने राज्यातील खासगी अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील शासनमान्य पदांवरील कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजा तसेच महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती रजा मंजूर करता येत नाही असे राज्याच्या आयुष संचालनालयान पत्रान्वयें 28 जून 2019 रोजी सहायक संचालनालय ,आयुष यांच्या मुंबई कार्यालयास पत्राद्वारें कळवले असल्याचे समोर आले आहे, सत्यजीत तांबे म्हणाले.
प्रसूती आणि बालसंगोपन सारखा अत्यंत नाजूक विषय तत्कालीन फडणवीस सरकारने अतिशय असंवेदनशीलपणे हाताळला असुन त्यासंदर्भातील उपरोक्त शासकीय परिपत्रक (जी आर) तातडीने रद्द करण्यात यावा आणि खाजगी अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयाच्या शासनमान्य महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती/बालसंगोपन रजा लागू करण्यात यावी अशी मागणी सत्यजीत तांबे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली असल्याचे तांबे यांनी ट्विट करून सांगितले.
एकीकडे जग 21 व्या शतकात पुरुषांना पॅटर्निटी लिव्ह देत असताना आपण मात्र उलट्या दिशेने चाललो आहोत असे त्यांनी नमूद केले .
वरील मागण्यांवर अंमलबजावणी झाल्यास राज्यभरातील शासकीय ,निमशासकीय व खासगी कंपन्यांतील सर्वच महिला कर्मचाऱ्यांसाठी हा एक सुखद दिलासा देणारा निर्णय असेल .