Breaking News

जीवनातील स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी उत्तम आरोग्य आवश्यक…..डॉ. झोया पानसरे

Share

दि. 16 फेब्रुवारी 2020) स्पर्धेच्या युगात जीवनातील प्रत्येक टप्प्यात यशस्वी होण्यासाठी उत्तम आरो’ग्य आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी शिक्षणाएवढेच व्यायाम व मैदानी खेळांना देखील महत्व दिले पाहिजे. रुग्णाला फिजीओथेरपीचे उपचार देणारी व्यक्ती देखील सुदृढ असली पाहिजे. या उद्देशाने ‘रेडीएन्स 20’ या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. असे प्रतिपादन डॉ. झोया निहाल पानसरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर व ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निगडी प्राधिकरण येथील ‘स्व. श्री. फकीरभाई पानसरे एज्युकेशन फाऊंडेशन कॉलेज ऑफ फिजीओथेरपी’ (एलएसएफपीईएफ) महाविद्यालयाच्या वतीने ‘रेडीएन्स 20’ या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन फिजोओथेरपी मिट 2020 चे आयोजन करण्यात आले आहे. मदनलाल धिंग्रा स्टेडियम येथे आयोजित केलेल्या स्पर्धांचे उद्‌घाटन संस्थेचे विश्वस्त डॉ. झोया निहाल पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त निहाल पानसरे, डॉ. शाम अहिरराव, प्राचार्या डॉ. स्वाती भिसे, रोटरी क्लबचे संचालक जगदीश, प्रशासन अधिकारी राजू शिंगोटे, डॉ. वर्षा कुलकर्णी, डॉ. श्वेता पाचपुते, डॉ. गार्गी भालेकर, डॉ. पल्लवी चिचोलीकर, डॉ. श्रृती मुलावकर, डॉ. विरेंद्र मेश्राम आदींसह राज्यभरातून आलेले स्पर्धेक उपस्थित होते.
‘रेडीएन्स 20’ या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन फिजीओथेरपी मिट 2020 मध्ये राज्यभरातील 26 फिजीओथेरपी महाविद्यालयांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये राज्यस्तरीय डान्स स्पर्धा (मुले, मुली), व्हॉलीबॉल (मुले), क्रिकेट (मुले, मुली), थ्रो बॉल (मुली) आणि बॅटमिंटन (मुले, मुली, डबल, सिंगल, मिक्स – डबल) या स्पर्धा होणार आहेत. विजेत्या संघांना रोख सांघिक व वैयक्तीक पारितोषिके, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. ‘रेडीएन्स 20’चा बक्षिस वितरण समारंभ गुरुवारी (दि. 20) दुपारी 12 वाजता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आझमभाई पानसरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. विश्वस्त डॉ. शाम अहिरराव, प्राचार्या डॉ. स्वाती भिसे यांनी मार्गदर्शन केले.

Check Also

The Kalyani School signed off 2022 in style, with their Finale event of the year, Mad About the Arts

Share   The Kalyani School signed off 2022 in style, with their Finale event of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *