Breaking News

व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड; दोघांना अटक

Share

Source- Loksatta

पुणे शहरातून गेल्या दीड वर्षात चाइल्ड पोर्नोग्राफीचे तब्बल १५० व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने यांसदर्भात माहिती दिली असून दोन जणांना अटकही केली आहे. या संदर्भात खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुण्यातून ही घटना घडल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.

या प्रकरणी पोलिसांनी राजकिरण पट्टीलाल (वय २४, रा. गुरुवार पेठ) आणि मनोजकुमार झल्लर सरोज (वय १९, रविवार पेठ) या दोन आरोपींना ताब्यात घेतला आहे. हे दोघेही मोल-मजुरी करुन आपली उपजीविका भागवतात, असे पोलिसांनी सांगितले.

पोलीस महासंचालक कार्यालयाने अशा प्रकारच्या व्हिडिओंबाबतची माहिती पुणे पोलिसांनी कळवली होती. त्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर सेलने हे व्हिडिओ कुठून आणि कसे अपलोड झाले याचा तपास केला. दरम्यान, पुण्यातून हा प्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. तपासामध्ये लॅपटॉप आणि मोबाईलमधील इंटरनेटच्या माध्यमातून हे व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे पोलिसांच्या हाती सोमवारी यासंदर्भातील लिंक आल्या होत्या. त्यानुसार कुठल्याही आयपी अॅड्रेसवरुन हे व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते याचा शोध पोलिसांनी घेतला. यामध्ये पुण्यातून १५० क्लिप्स अपलोड झाल्याचे निदर्शनास आले.  दरम्यान, यापूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी ५ गुन्हे दाखल आहेत. तर पुण्यात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे.

Check Also

Transformation of “Human Being” to “Being Good Human” is the Core Purpose of Education: Dr. Vedprakash Mishra

Share Pune: Each one of you is unique and legitimately entitled to uniqueness. How many …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *