नमस्कार मित्रहो,
आता शाळा आणि कॉलेज ना विषाणू फैलाव रोखण्यासाठी सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. सबब सर्व पालकांना सूचित करण्यात येत आहे की मुलांना सार्वजनिक ठिकाणी जसे की बागा, उद्याने अश्या ठिकाणी नेल्यास गर्दी होऊन पुनःश्च प्रसाराचा धोका उदभवू शकतो. तेव्हा पालकांनी गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक स्थळी जेथे गर्दी होऊन कोरोना चा प्रसार होऊ शकतो अश्या जागी मुलांना घेऊन जाऊ नये अथवा पाठवू नये. आपापल्या पाल्याना हात धुण्याचे महत्व समजावून सांगावे तसेच चेहेऱ्याला डोळ्यांना, नाकाला अथवा तोंडाला वारंवार स्पर्श न करण्यास सांगावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. खोकताना अथवा शिंकताना नाकासमोर रुमाल धरावा. कोणालाही सर्दी खोकला अथवा ताप अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टर चा सल्ला घ्यावा.
शहर कोरोना मुक्त ठेवण्यासाठी सर्व नागरिकांना आवाहन करावे.
Shravan Hardikar, Commissioner, PCMC….धन्यवाद.